फेकलेल्या कागदांपासून भन्नाट वस्तू!

आपण घरातला जुना पेपर कचऱ्यात किंवा रद्दीत टाकतो.

कलाकार मंडळी याच रद्दीच्या पेपरमधून पुन्हा नव्या वस्तू तयार करु शकतात.

मुंबईत राहणाऱ्या सर्वेश कीर या तरुणाने रद्दीच्या पेपरपासून 100 पेक्षा जास्त वस्तू तयार केल्यात.

गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तूंचाही यामध्ये समावेश आहे.

वरळीच्या रहेजा कॉलेज मधून शिक्षण घेतलेला सर्वेश गेल्या आठ वर्षांपासून रद्दी पेपर, कार्डबोर्ड पासून वेवेगेळ्या कलाकृती तयार करतोय.

अभ्यासून रिकामा वेळ मिळाला की पेपरपासून  कलाकृती तयार करण्याचे काम सर्वेश करत होता.

सुरुवातीला त्याने टूथपेस्टच्या रिकाम्या बॉक्स पासून ट्रक आणि हेलिकॉप्टर तयार केले. त्याच्या या कलेचं अनेकांनी कौतुक केलं.

या कौतुकानं सर्वेचा आत्मविश्वास वाढवला. त्यानं आणखी प्रयोग केले.