गुजरातनंतर मुंबईत अस्सल बांधणी
गुजरातनंतर मुंबईत अस्सल बांधणी
बांधणीचे ड्रेस चांगलेच लोकप्रिय असून सर्व वयोगटातील महिलावर्गाला ते आवडतात.
या ड्रेसचा विचार केला की अनेकांना गुजरात राज्य पहिल्यांदा आठवते.
आता बांधणीचे हे ड्रेस आपल्या मुंबईतही होलसेल भावात मिळतात.
मुंबईच्या दादर मार्केटमधील दुकानात विविध रंगाचे आणि पॅटर्नचे बांधणीचे ड्रेस मटेरियल मिळतात.
अगदी अस्सल कॉटनची बांधणी असल्यामुळे या ड्रेसला चांगली मागणी आहे.
कॉटन, सिल्क अश्या विविध प्रकारच्या कपडावर ही डिझाईन तयार केली जाते.
वायफाय डिझाईन, लखनवी वर्क, ऑल ओव्हर बुट्टा, कॉटन सॅटिन आदी प्रकार येथे उपलब्ध आहेत.
होलसेल दरात येथे 500 रुपये ते 1000 रुपयांच्या आत बांधणी ड्रेस मटेरियल मिळतात.
कोणतीही जुनी वस्तू मिळण्याचं ठिकाण, ‘इथं’ 90 वर्षांपासून भरतो हा बाजार
Learn more