मुंबईतील फेमस मसाला मार्केट

मुंबईतील फेमस मसाला मार्केट

भारतात अनेक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची ओळख आहे. 

वाशी, तुर्भे, सानपाडा स्थानकापासून जवळ असणाऱ्या या बाजारात फळे, भाज्या, मसाले आदी मिळतं.

याच ठिकाणी गेल्या 31 वर्षांपासून मसाला मार्केट असून 200 पेक्षा अधिक दुकाने आहेत.

मिरची, धने, हळद, दालचिनी, खसखस, लवंग, वेलची आदी मसाल्याचे पदार्थ इथं मिळतात.

 जायफळ, खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबरं, चिंच आदी प्रकारचे मसालेही या बाजारात मिळतात.

हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट असल्याचं व्यापारी अमरीश बरोट सांगतात.

सुरुवातीला मोहम्मद अली रोडला असणारं मार्केट पुढं 1991 मध्ये वाशीला स्थलांतरित झालं. 

मुंबईचं सिक्रेट मार्केट