रात्री शांत झोप हवीय? मग झोपताना घ्या 'ही' प्येय!

आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली झोप महत्त्वाची आहे. 

अनेक कारणांमुळे रात्री झोप लागत नाही. त्यामुळे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ बिघडते. 

चांगली झोप येण्यासाठी तुम्ही आरोग्यदायी पेयांचा अवलंब करु शकता.

डिकॅफिनेटेड ग्रीन टी शांत झोपेसाठी उपयुक्त आहे.

कॅमोमाइल चहा झोपेची गुणवत्ता वाढवते. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात.

बदाम दूध मेंदूतील सेरोटिनला प्रोत्साहन देते आणि शांत झोप लागते.

चेरी रसामुळे शांत झोप येते. हे लोकप्रिय पेय आहे. 

हळदी दूधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे चांगली झोप लागते. 

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तरीही घेताना हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घ्यावा.