बॉलिवूड सोडून बिझनेस करतेय ही अभिनेत्री!
बॉलिवूड सोडून बिझनेस करतेय ही अभिनेत्री!
बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीने आपल्या अभिनयानं आणि निखळ हास्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
1984 मध्ये ‘सनम’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.
80-90 च्या दशकात नीलम एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती.
मात्र, करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीनं सिनेसृष्टीतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.
नीलम 2001 मध्ये चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत ‘नीलम ज्वेल्स’ या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
तिने 2004 साली मुंबईत एक दागिन्यांचं शोरूम उघडलं.
त्यानंतर 25 ऑगस्ट 2011 रोजी मुंबईत ‘नीलम कोठारी फाइन ज्वेल्स’ नावाने एक स्वतंत्र दागिन्यांचं दुकान सुरू केलं.
नीलम या व्यवसायात चांगलीच यशस्वी झाली.
नुकतंच नीलमने ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं.