बहुतेकांना भगवान शंकराची पूजा करण्यासाठी घरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करायची असते.
तुम्ही घरात शिवलिंग स्थापित करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
शिवलिंग कोणीही घरात ठेवू शकत असलं तरी त्यासंबंधीचे नियम जाणून घेणं गरजेचं आहे.
नर्मदा नदीच्या दगडापासून बनवलेलं शिवलिंग घरात ठेवावं. हे अधिक शुभ आहे.
स्थापना करताना शिवलिंग उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावं.
याशिवाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित पूजा करणं खूप महत्वाचं आहे.
मात्र पूजा करताना शिवलिंगावर हळद लावणं टाळावं.
घरामध्ये शिवलिंगाचा अभिषेक करू नये. विधीप्रमाणे पूजा करावी.
शिवलिंगाची जागा बदलू नये याची विशेष काळजी घ्यावी
जर विशेष कारणास्तव असं करावं लागलं तर आधी गंगाजल आणि थंड दुधाने स्नान करावं आणि नंतर जागा बदलावी.