दुधासोबत 'या' 3 गोष्टी खाल तर चेहऱ्यावर येतील पांढरे डाग
दूधाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
मात्र असे काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन दुधासोबत केल्याने चेहऱ्यावर पांढरे डाग येतात.
आयुर्वेदानुसार मासे आणि दूध यांचे सेवन सोबत करू नये.
मासे आणि दूध हे दोन विषाप्त पदार्थ आहेत, ज्यामुळे शरीरावर सफेद डाग येऊ शकतात.
मासे अनेक दूधामचे एकत्र सेवन केल्याने पोटात गॅस, अपचनाची समस्या होते.
मासे खाल्ल्यावर जवळपास 2 ते 3 तास दुधाचे सेवन करू नये.
द्राक्ष, संत्री, डाळिंब अशा आंबट आणि लिंबूवर्गीय फळांचे दुधासोबत सेवन करू नये.
आंबट फळांमध्ये असलेले अम्लीय घटक दुधातील प्रथिने जमा करतात, ज्यामुळे दूध पचू शकत नाही आणि पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकतात.
परिणामी त्वचेवर पांढरे डाग पडणे, पोटदुखी, गॅस आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
दुधासोबत नारळ किंवा त्याचे पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
ना औषध ना तेल, एकही रुपया खर्च न करता मिळेल गुडघेदुखीपासून आराम