बाहेर कितीही ऊन असलं तरी 'या' ९ गोष्टी कधीही ठेवू नका फ्रीजमध्ये

ब्रेड: फ्रीजमध्ये ठेवल्यास हे लवकर खराब होतात.

टोमॅटो: फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव आणि पोत दोन्ही खराब होण्याचा धोका असतो.

मध : मध फ्रीजमध्ये ठेवल्यास ते गोठते.

टरबूज : जरे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर त्यातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.

बटाटा: त्यात भरपूर स्टार्च असते जे फ्रीजमध्ये ठेवल्यास साखरेमध्ये बदलते.

कांदा : रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ओलावा शोषून खराब होतो.

लसूण : फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर फुटू लागते.

केळी : केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर काळी पडते.

कॉफी : फ्रीजमध्ये ठेवल्यास ती प्रत्येक गोष्टीचा वास शोषून घेते.