अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेटवर्क 18 ला विशेष मुलाखत दिली. ज्यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय.
देशात नोकऱ्या निर्माण करण्याच्या प्रश्नांवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सविस्तर उत्तर दिलं.
अर्थमंत्री म्हणाल्या, ‘कॉलेज आणि आयआयएम सारख्या कॅम्पसमधून होणारी भरती महत्त्वाची आहे
मात्र देशात मिडल आणि लोअर लेव्हलमध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाहीये, यावरही लक्ष द्यायची गरज आहे.
जॉब मार्केटचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रांमधल्या रोजगाराचा डेटा मिळवणं गरजेचं आहे.
नवीन कंपन्यांनी जॉब आणि रिक्रुटमेंटसाठीच्या प्राथमिकता बदलल्या आहेत, त्यामुळे तरुणांना त्या स्किल सेटसोबत तयार व्हावं लागेल, जे याआधी त्यांना मिळत नव्हतं.
देशाच्या विकासदराविषयी बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, मला आशा आहे की 7 टक्के विकासदाराचे लक्ष गाठण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
भारताची अर्थव्यवस्था सलग वाढत आहे, आम्ही महागाईला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये आपला भांडवली खर्च हा 10 लाख कोटी रुपये इतका असेल असंही अर्थमंत्री म्हणाल्या.