गिअर्स टाकायची कटकट नाही! घरी आणा सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

सध्या मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक कारला लोकांची पसंती मिळत आहे. अशातच आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कारबाबत माहिती देणार आहोत जाणून घ्या सविस्तर.

गेल्या काही वर्षांमध्ये ऑटोमॅटिक कारच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या कारमध्ये तुम्हाला गिअर्स बदलण्याची गरज नसते. त्यासोबतच थकवाही येत नाही.

ऑटोमॅटिक कारचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त ऑटोमॅटिक कारबाबत सांगणार आहोत. ज्यांची किंमत सर्वात कमी आहे.

मारुती वॅगन आर ही कार दोन भिन्न पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. ज्यात 1.2 लीटर पेट्रोल कार स्वयंचलित प्रकारात वापरले गेले आहे.

ही कार चार प्रकारांमध्ये येते. ही कार प्रति लिटर 24 किलोमीटर मायलेज देते. या कारची किंमत 6.45 लाख रुपये आहे.

मारुति सेलेरियोच्या ऑटोमॅटिक कारमध्ये 1 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले गेले आहे. त्याचे स्वयंचलित प्रकार देखील VXI आणि ZXI मॉडेल्सवर आधारित आहे. या कारची किंमत 6.29 लाख रुपये आहेत.

मारुति एस-प्रेसोचे ऑटोमॅटिक व्हेरियंट VXI मॉडेलवर आधारित आहे. ही कार प्रति लिटर 25 किलोमीटर मायलेज देते. या कारची किंमत 5.67 लाख रुपये आहे.

मारुति अल्टो K10 चे ऑटोमॅटिक व्हेरियंट VXI मॉडेलवर आधारित आहे. ही कार प्रति लिटर 24 किलोमीटर मायलेज देते. या कारची किंमत 5.51 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट क्विड ही चार ऑटोमॅटिक ट्रिममध्ये उपलब्ध आहे. ही कार प्रति लिटर 22 किमी मायलेज देते. या कारची किंमत 5.45 लाख रुपये आहे.