999 रुपयांना लॉन्च झाला हा Nokia फोन, ऑनलाइन पेमेंट फीचरसहित

Nokia 105 Classic भारतात लॉन्च झाला आहे.

भारतात त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

या फोनमध्ये UPI अॅप इन-बिल्ट देण्यात आले आहे.

या फीचर फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओ आहे.

विशेष बाब म्हणजे इअरफोन न लावता या फोनमधून एफएम लावता येईल.

कंपनी या फोनवर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील देत आहे.

टिकाऊपणाच्या चाचणीत हा फोन बराच मजबूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे कठीण परिस्थितीतही हा फोन चांगली कामगिरी करेल.

कंपनीचा दावा आहे की बॅटरीचे आयुष्य देखील चांगले आहे.