गणेशोत्सवात बाप्पाला अर्पण करा ही 8 प्रकारची फूलं

जास्वंदीच्या फुलांचा वापर गणेशपूजेत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.

झेंडूची फुले उठावदार नारंगी आणि पिवळ्या रंगामुळे आकर्षक दिसतात. गणेशोत्सवामध्ये मंडप सजवण्यापासून पूजेमध्ये ही फूलं वापरतात.

फुलांमध्ये कमळाच्या फुलाला वेगळं महत्त्व आहे. हे फूल ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतं. श्रीगणेशाला कमळाची फुले अर्पण करणं शुभ मानतात.

गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्ती विविध रंगांच्या शेवंतीच्या फुलांनी सजविली जाते.

गुलाब हे प्रेम आणि निष्ठेचं प्रतिक मानलं जातं. श्रीगणेशाला गुलाब अर्पण करण्यातून प्रामाणिक प्रेम आणि आदर व्यक्त होतो.

सुवासिक चमेलीचे फूल हिंदू धर्मात विशेष शुभतेसाठी प्रसिद्ध आहे.

दहलिया ही रंगीबेरंगी, आकर्षक फुले विविध रंगात येतात. प्रतिकूल परिस्थितीतही शांती आंतरिक धैर्याची कारक मानली जातात.

फूल नसले तरी तुळशीची पानं मंजिरीसह गणेश पूजेत वापरली जातात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही