पुण्यातल्या ‘या’ गुहेत होतं पांडवांचं वास्तव
स्मार्ट सिटी अशी पुणे शहराची ओळख असली तरी शहराचं इतिहासाशी घट्ट नातं आहे.
वेगवेगळी मंदिरं आणि वास्तूंमधून या खुणा दिसतात.
पुणे शहर आणि परिसरातली काही मंदिरं आणि लेणी ही हजारो वर्ष जुनी आहेत.
यापैकी एका मंदिर महाभारतकालीन असून पांडवांनीच ते एका रात्रीत बांधलं अशी श्रद्धा आहे.
पुण्यातल्या बाणेर परिसरात हे मंदिर आहे.
बाणेरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या थोडं पुढं जाऊन काही पायऱ्या चढल्यानंतर एका गुहेत हे मंदिर आहे.
या मंदिराबाबत एक खास अख्यायिका असून मंदिराचे पुजारी गणेश भुजबळ यांनी याची माहिती दिली.
पांडव अज्ञातवासामध्ये बाणेरमध्ये वास्तव्याला होते.
टेकडीमध्ये एका रात्रीत हे मंदिर कोरले, अशी अख्यायिका आहे.
पांडवांनी मंदिरामध्ये तीन वेगवेगळ्या गुहा निर्माण केल्या. अर्जूनाने बाण मारून जलकुंडांमधून पाणी काढले.
मंदिराचे मोठमोठे दगड भीमाने हाताने कोरले आहेत देखील आख्यायिका आहे, असंही भुजबळ यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
विनायक चतुर्थीसाठी WhatsApp Status
Learn more