तुळशी विवाहाला अशा बिनचूक म्हणा मंगलअष्टका

स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं थेवरम् ।।

लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं । ग्रामे रांजणनामके गणपती: कुर्यात् सदा मंगलम् ।।

इथंपर्यंत मंगलाष्टकामध्ये अष्टविनायकांची व त्या स्थळांची नावे गुंफलेली असून मंगल करण्याविषयी अष्टविनायकाला प्रार्थना केलेली आहे.

गंगा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता च या गण्डकी । पूर्णा: पूतजलै समुद्रसहिता: कुर्वन्तु वो मंगलम् ।।

इथंपर्यंत मंगलाष्टकामध्ये नद्यांची नावे गुंफण्यात आली असून समुद्रसहित पवित्र नद्यांना मंगल करण्याची प्रार्थना केलेली आहे. निसर्ग म्हणजेच ईश्वर ही त्यामागे भावना आहे. 

लक्ष्मी: कौस्तुभपारिजातकसुरा धन्वतरिश्चंद्रमा । गाव: कामदुघा सुरेश्वरगजो रम्भादिदेवांगना: ।।

अश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शंखोऽमृतं चाम्बुधे: । रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनी कुर्वन्तु वो मंगलम् ।।

समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने बाहेर आली ती मंगल करो अशी प्रार्थना या मंगलाष्टकामध्ये करण्यात आलेली आहे.