स्टारकिड्सचा बेस्टफ्रेंड ऑरी नक्की आहे तरी कोण?

स्टारकिड्सचा बेस्टफ्रेंड ऑरी नक्की आहे तरी कोण?

बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीत स्टारकिड्ससोबत दिसणारा हॅन्ड्सम हंक म्हणजे ऑरी.

न्यासा, जान्हवी, सारा सगळ्याच स्टारकिड्स ऑरीच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. 

पण स्टारकिड्ससोबत ऑरीची एवढी मैत्री कशी आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.कोण आहे हा ऑरी जाणून घ्या.  

ऑरीचं पूर्ण नाव ओरहान अवत्रमणी असं आहे. मात्र त्याला सर्वजण ऑरी या टोपणनावानेच ओळखतात. 

मुंबईत जन्मलेल्या ओरहानने न्यूयॉर्कमध्ये फाईन आर्ट आणि कम्युनिकेशन डिझायनिंगचा अभ्यास केला आहे. 

ऑरी हा एक बेस्ड सोशल एक्टिव्हिस्ट आहे. त्याने सारासोबत कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

ऑरीला प्रोफेशनल ऍनिमेटर व्हायचं आहे. 

त्याच्या लिंक्डइनच्या प्रोफाइलनुसार ऑरी अंबानींच्या रिलायन्स कंपनीमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. 

त्यामुळेच त्याचे अंबानी कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.