10 वर्षांपूर्वीच्या लग्नाला चक्क हायकोर्टानं रद्द केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली
अजब प्रथेतून झालेल्या या लग्नातून तरुणाची सुटका तब्बल १० वर्षांनी झाली, ही प्रथा काय आणि नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया
पकडौआ विवाह नावाची एक प्रथा आहे जिथे घरचे तरुणाचं अपहरण करुन जबरदस्ती आपल्या मुलीचं लग्न लावून देतात
अशाच एका लग्नावर हायकोर्टानं आपला निर्णय देत १० वर्षांचं लग्न रद्द केलं आहे
ही घटना बिहारच्या नावादा भागात घडली, दोन कुटुंबात न्यायासाठी लढाई सुरू होती
30 जून 2013 रोजी तरुणाला सैन्यदलात नवी नोकरी लागली होती, त्यावेळी त्याला लग्नासाठी विचारलं असता कुटुंबाने आणि त्याने विरोध केला
तरुणीच्या कुटुंबियांनी तिचं प्रेम होतं म्हणून लग्न करुन दिल्याचं सांगत कोर्टानं आम्हाला न्याय दिला नाही सुप्रीम कोर्टात जाऊ असं म्हटलं आहे
पकड़ौआ विवाह असा विवाह ज्यामध्ये मुलाचे अपहरण करून जबरदस्तीने लग्न केले जातं उत्तर बिहारमध्ये असे विवाह अधिक प्रमाणात होत होते. ऐंशीच्या दशकात बिहारमध्ये अशा विवाहांची अनेक प्रकरणे पाहायला मिळाली
बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये दरवर्षी सुमारे तीन ते चार हजार सक्तीच्या विवाहाची प्रकरणे नोंदवली जातात