हे 10 पदार्थ मुलांना अजिबात देऊ नका!

लहान मुलांना नेहमीच योग्य आहार दिला पाहिजे अन्यथा ते त्यांच्या आरोग्यास अगदी लहानपणापासून हानी पोहोचवू शकते. 

सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि साखर घातलेले फळांचे ज्युस वजन वाढवू शकते आणि यामुळे दातही किडू शकतात. 

कँडीज, चॉकलेट्स आणि इतर साखरयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने दातांच्या समस्या उद्भवतात.

चिप्स आणि साखरयुक्त तृणधान्ये यांसारख्या उच्च प्रक्रिया केलेल्या स्नॅक्समध्ये बऱ्याचदा अनहेल्दी फॅट्स, जास्त मीठ असते.

फ्रेंच फ्राईज आणि तळलेले चिकन सारख्या पदार्थांमध्ये अनहेल्दी फॅट्स आणि कॅलरी जास्त असतात.

फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने मुलांचे आरोग्य बिघडू शकते आणि वजनही अनियंत्रित होऊ शकते. 

ट्रान्स फॅट्स असलेले, बेक केलेले आणि तळलेले पदार्थ हे हृदयरोगाशी संबंधित समस्यांचे कारण बनू शकतात. 

एनर्जी ड्रिंक्स सारखे पदार्थ आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ मुलांच्या झोपेवर परिणाम करू शकतात.

कच्ची किंवा कमी शिजलेली अंडी, मांस आणि सीफूडमुळे अन्नजन्य आजार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.