कुठे झाली परिणीती आणि राघवची पहिली भेट? 

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

दोघेही राजस्थानमधील उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. 

परिणीती आणि राघव या दोघांचंही कार्यक्षेत्र खूपच वेगळं आहे. 

परिणीती एक अभिनेत्री तर राघव राजकरणात सक्रिय आहे. 

या दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती असं सांगितलं जातं.

 दोघेही यूकेमध्ये शिकत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. 

रिपोर्ट्सनुसार, परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. 

परिणीती आणि राघव दोघेही जानेवारीत लंडनमध्ये झालेल्या पहिल्या इंडिया यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. 

तेव्हाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता कायमचे एकमेकांचे झाले आहेत.