पौष प्रदोष-शिवरात्री लागोपाठ! महादेवाच्या कृपेनं डबल लाभ

प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. 

 एका वर्षात 24 प्रदोष व्रत केले जातात. महादेवाची पूजा करण्याचा हा उत्तम दिवस असतो

प्रदोष व्रत एक कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षात येतं

पौष महिन्याची कृष्ण पक्ष तिथी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 02:02 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:17 वाजता समाप्त होईल.

प्रदोष व्रताच्या दिवशी सायंकाळी महादेवाची पूजा केली जाते. प्रदोष व्रत पूजा 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 06:05 ते 08:41 दरम्यान करता येईल.

या दिवशी शंकराला जलाभिषेक करून एक धतुरा आणि एक शमीपत्राचे फूल अर्पण करावे.

यामुळे कुंडलीत शनीची साडेसाती चालू असेल तर होणारे त्रास कमी होतात.

या दिवशी तामसिक अन्न पदार्थ खाणे टाळायला हवे

यामुळे व्यक्तीला व्रताचा लाभ मिळत नाही.

एकादशी तिथीप्रमाणेच प्रदोष व्रताच्या दिवशीही भाताचे सेवन करू नये.

याशिवाय तिखट खाणं आणि मीठ खाणंही टाळतात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही