शुगर असूनही जिमला जाताय? ही चूक नको

शुगर असूनही जिमला जाताय? ही चूक नको

वेळी अवेळी जेवण आणि झोप यामुळे पीसीओडी, मधुमेह, पॅरालिसिस असे आजार बळावत आहेत. 

योग्य पद्धतीने व्यायाम केला तर असे आजार झाल्यानंतरही या आजारांवर नियंत्रण मिळवता येते.

कल्याण येथील जिम ट्रेनर साहील रामपुरकर यांनी व्यायाम आणि आहाराबाबत काही टिप्स दिल्या आहेत.

पॅरालिसिस रुग्णांचे मसल्स कमकुवत झाल्याने सुरुवातीला हलका व्यायाम करावा लागतो. 

अवेळी झोप, जेवणाच्या वेळा आणि बदलती जीवनशैली यामुळे अनियमित पाळीचा त्रास महिलांना होतो. 

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी व्यायम आणि योग्य आहार गरजेचा आहे. 

शरीरातील इन्शुलिनची पातळी संतुलित राहण्यासाठी योग्य व्यायम करणे आवश्यक आहे. 

शुगर, पीसीओडी, पॅरालिसिस आणि इतर कोणताही त्रास असल्यास आधी ट्रेनरला सांगावे.