दिवसभरात 10,000 वेळा झोपतो 'हा' प्राणी 

सामान्य माणून दिवसभरात एक किंवा दोन वेळेस झोपतो.

पण पृथ्वीवर असा एक प्राणी आहे जो दिवसभरातून 10,000 वेळा झोपतो. 

तुम्ही या प्राण्याविषयी ऐकलं असेल किंवा याला पाहिलंही असेल. 

चिनस्ट्रॅप पेंग्विन असं या प्राण्याचं नाव आहे. हा प्राणी अंटार्क्टिकामध्ये राहतो.

चिनस्ट्रॅप पेंग्विनवर संशोधकांनी अभ्यास केला आहे. 

चिनस्ट्रॅप पेंग्विन दिवसभरात 10,000 वेळा झोपतो, असं संशोधनातून समोर आलंय. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची झोपण्याची वेळ फक्त चार सेकंद आहे.

अभ्यासानुसार, हे प्राणी दिवसभरात 11 तास झोपतात. 

 ल्योन न्यूरोसायन्स रिसर्च सेंटर आणि कोरिया पोलर रिसर्च इन्स्टिट्युटच्या टीमने हे संशोधन केलं आहे.