चप्पल न घालता फिरतात येथील लोक, कारण काय?

सर्वच लोक पायांना सुरक्षित ठेवण्यासाठी चप्पल, शूज घालतात. 

मात्र काही देशांमध्ये लोक मुद्दाम अनवाणी फिरतात. पण का? यामागे काय कारण आहे?

ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंडमध्ये लोक विनाचप्पल फिरतात. त्यांना ही रोजची सवय झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जवळपास अनावणी फिरतात.

कामासाठी जाताना, मैदानावर जाताना, बीच, रस्त्यांवर फिरताना लोक विनाचप्पल दिसतात, मात्र यामागे जे कारण आहे ते वाचून तुम्हालाही हे फायद्याचं वाटेल.

न्यूयॉर्क टाइम्सचे लेखक सेठ कुगल यांनी 2012 मध्ये या न्यूजीलंट यात्रेदरम्यान याविषी सांगितलं होतं.

न्यूजीलंडमध्ये सर्व लोक विनाचप्पल फिरतात. याशिवाय ऑस्ट्रेलियामध्येही जवळपास लोक अनवाणी दिसतील. अनवाणी फिरण्यामागे त्यांचं कारण आहे आरोग्य.

अनवाणी चालल्यावर शारिरीक मुद्रा चांगली राहते आणि आरोग्यही सुधारते. 

दोन्ही देशांमधील लोकांचं म्हणणं आहे की, यामुळे संस्कृतीचाही प्रभाव दिसून येतो. तर काही म्हणतात आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

असं नाही की सर्वच विनाचप्पल फिरतात. पण मात्र अनवाणी जास्त फायदेशीर मानलं जातं.