पपईमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
डायबेटिज, हृदय आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी पपई फायदेशीर मानली जाते.
परंतु असे देखील काही आजार आहेत ज्यात पपई खाणे धोकादायक ठरू शकते.
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी पपईचे सेवन टाळावे.
पपई खाल्ल्याने कॅल्शियम ऑक्सलेटची स्थिती निर्माण होऊन स्टोनचा आकार वाढू शकतो.
हृदयाचे ठोके अनियंत्रित असलेल्या लोकांनी पपईचे सेवन टाळावे.
पपईत सायनोजेनिक ग्लायकोसाइड आढळते जे अमीनो ऍसिडसारखे काम करते. यामुळे पचनसंस्थेत हायड्रोजन सायनाइड तयार होते आणि त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची समस्या वाढू शकते.
गरोदर महिलांनी पपई खाणे टाळावे.
पपई खाल्ल्याने गर्भाशयाचे आकुंचन होऊन प्री-डिलीव्हरी होण्याचा धोका वाढतो.
हायपोग्लायसेमिया असलेल्या लोकांनी देखील पपईचे सेवन टाळावे.
हायपोग्लायसेमियाचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या रक्तात साखरेची पातळी कमी असते, पपईमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी आणखी कमी होते.
पपई खाल्ल्याने हृदयाचे ठोके जलद होतात किंवा कधी कधी शरीर थरथरू लागते.
पपईची ऍलर्जी असलेल्या लोकांनी देखील पपईचे सेवन टाळायला हवे.
सदर लेख हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.