दोन जणांना ही एक प्लेट पाणीपुरी सहज पुरते. त्यामुळे एकाच प्लेटमध्ये पिझ्झा आणि पाणीपुरी खाल्ल्याचा आनंद मिळतो.
ही पाणीपुरी बनवण्यासाठी पिझ्झासाठी स्फटिंग वापरतात त्याच पद्धतीचं स्टफिंग वापरलं जातं. या पाणीपुरीमध्ये नेहमीच्या पाणीपुरीसारखं कोणत्याही प्रकारचं गोड किंवा तिखट पाणी नसतं.
त्याऐवजी मक्याचे दाणे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, चिली फ्लेक्स, मेयॉनिज आणि वेगवेगळ्या भाज्या वापरून या पाणीपुरीत चीज, सॉसेस टाकले जातात. वरून पुन्हा भरपूर चीज या पुरीवर असतं.
त्यामुळे खवय्यांना एका वेगळ्याच चवीची पाणीपुरी चाखायला मिळते.