विमान प्रवास सर्वात घाणेरडा!  प्लेनमधील  डर्टी सीक्रेट्स

विमानातून प्रवास करण्यासाठी हजारो रुपयांचं तिकीट. पण त्या प्रवासामागे किती तरी डर्टी सिक्रेट्स आहेत.

अमेरिकन एअर हॉस्टेस मारिका मिकुसोवाने एका पुस्तकात  विमानातील धक्कादायक गोष्टी सांगितल्यात.

तुर्कस्तान प्रवासात  3 प्रवाशांनी लघवी पिशवीत भरून विमानात सोडली. लघवी संपूर्ण विमानात पसरली.

एका प्रवाशाने टॉवेलने आपली काख स्वच्छ करून ते घाणेरडं टॉवेल एअर हॉस्टेसच्या हातात दिलं.

सर्व प्रवाशी जेवताना एका महिलेने मुलाचं डायपर बदललं. कित्येक पालक ते डायपर सीटच्या पॉकेटमध्येच ठेवतात.

कित्येक वेळा सीट्सवर पीरिअडच्या रक्ताचे डागही असतात. स्वच्छतेस पुरेसा वेळ नसल्याने ते चादर टाकून झाकले जातात. 

विमानात साफसफाई करण्यास पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे सफाई कर्मचारी घाईगडबडीत स्वच्छता करतात.

काही वेळा या गोष्टी तशाच राहतात. ज्या दिसू नयेत, म्हणून फक्त लपवून ठेवल्या जातात.