डासांच्या कटकटीतून मुक्तीसाठी लावा ही झाडे

डासांच्या कटकटीतून मुक्तीसाठी लावा ही झाडे

घरात डास झाल्यास आपलं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. 

छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक यांनी डासांपासून मुक्तीसाठी माहिती दिलीय.

वनस्पती शास्त्रनुसार काही अशी झाडे आहेत जे आपण घरात लावल्यामुळे डासांचं प्रमाण कमी होतं. 

तुळस हे सर्वांच्या घरात असणारं झाड असून याच तुळशीच्या मंजुळाच्या वासामुळं डास येत नाहीत.

घराच्या अवतीभोवती झेंडूची झाडे असतील तर घरात डास आणि सापदेखील येत नाहीत. 

माणसांना आवडणारा पुदिन्याच्या पानांचा वास डासांना मात्र आवडत नाही. 

सिट्रोनिला गवत घराच्या जवळ असल्यास त्याच्या वासाने कोणताच कीटक किंवा डास घरात येत नाही.