महाराष्ट्राच्या पोलिसाचा लॅटिन अमेरिकेत डंका 

आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही छंद असतात. मात्र छंद केवळ छंदापुरतेच न ठेवता त्यांना व्यावसायिक रूप दिले तर आपण आपल्या देशाची मान उंचावू शकतो.

जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी हेच दाखवून दिले आहे.

नुकत्याच लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकाची कमाई केलीय.

त्यामुळे डांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी एरिया मध्ये राहणारे डांगे मागील 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत.

पोलीस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला आहे.

या छंदा मधून त्यांना विविध संधी मिळत गेल्या आणि त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सिल्वर, गोल्ड आणि ब्रॉझ अशी विविध पदके मिळवली आहेत.

नुकत्याच लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी सिल्वर मेडल तर पावर लिफ्टिंग प्रकारात ब्रांझ मेडल मिळवले.

महाराष्ट्राचा स्टॅच्यू मॅन पाहिलात का?