हातमागापासून राख्या बनवणारं कुटुंब!

बहिण-भावाच्या नात्यातला सर्वात महत्त्वाचा रक्षाबंधनाचा सण आता काही दिवसांवर आलाय.

आपल्या लाडक्या भावाला ट्रेंडी राख्या बांधण्याची प्रत्येक बहिणीची इच्छा असते.

त्यानिमित्तानं बाजारात वेगवेगळ्या राख्या आता दाखल झाल्यात.

जालना जिल्ह्यातलं पोरवाल कुटुंब मागच्या 25 वर्षांपासून हातानं राख्या तयार करतात.

त्यांनी या व्यवसायातून 30  महिलांना रोजगारही दिलाय.

जालनामधल्या कडबी मंडी भागात या खास राख्या तयार होतात.

अनेकांना राखी खरेदी करण्यासाठी मुंबई किंवा गुजरातमध्ये जाणं शक्य होत नाही.

त्यांना जालना शहरातच होलसेल दरात राखी मिळावी यासाठी हा व्यवसाय सुरू केल्याचं पोरेवाल यांनी सांगितलं.

सध्या इथून संपूर्ण मराठवाड्यात राख्या पोहचवल्या जातात.