‘इथं’ 10 रुपयांपासून खरेदी मातीची भांडी

हल्ली इतरांपेक्षा हटके घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची खेरदी केली जाते. 

त्यामुळे इतरांच्या घरात ज्या वस्तू दिसत नाहीत त्या वस्तू घरात आणण्याचा विचार अनेकदा दिसतो.

त्यामुळे आम्ही आज तुम्हाला पुण्यात या वस्तू कुठे मिळतील याची माहिती सांगणार आहोत.

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील कुंभारवाड्यात या वस्तू मिळतात.

मातीच्या भांड्यामध्ये फक्त माठ नाही तर पाण्याची बाटली, कढई, तवा, दिवे, ग्लास, कप, असे खूप प्रकार पाहायला मिळतात.

या वस्तूंची खरेदी तुम्ही 10 रुपयांपासून करू शकता.