दगडूला मिळाली रिअल लाईफ प्राजु!

टाइमपास फेम दगडू म्हणजेच प्रथमेश परबच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर प्रथमेश आणि क्षितिजा लग्नबंधनात अडकले आहेत.24

प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांनी 14 फेब्रुवारीला साखरपुडा केला. त्यानंतर दोघांच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा होती.

अखेर आज 24 फेब्रुवारीला दोघांचं लग्न संपन्न झालं आहे.

प्रथमेश परब आणि क्षितीजाच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

लग्नाचे फोटो शेअर करताना प्रथमेशनं Finally……Lockdown love story चे Hearts, forever साठी locked’ असं म्हणत फोटो शेअर केले आहेत.

त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडिओत दोघेही वरमाला घातल्यानंतर एकेमकांच्या पाया पडले.

या दोघांचेही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रथमेश परब आणि क्षितीजाला वैवाहिक आयुष्यासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.