सध्याचा काळात अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.
पारंपारिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत.
कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीरची लागवड करीत आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील तरुण शेतकरी अभिजित लवांडे हे अंजीरची आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत.
विशेष म्हणजे या शेतीतून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
अभिजित लवांडे हे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावचे रहिवासी आहेत.
2019 मध्ये कोरोना महामारी आल्यानंतर त्यांची नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी ही शेती करायला सुरुवात केली.
त्यांचे वडील ही शेती आधी पारंपरिक पद्धतीने करत होते. पण आता तीच शेती अभिजित आधुनिक पद्धतीने करत आहेत.
2019 मध्ये 32 गुंठे जागेमध्ये 14 लाख रुपये इतकं उत्पन्न काढलं होतं.
खर्च जाऊन 10 लाख रुपये निव्वळ नफा काढला होता. यावर्षी आतापर्यंत 4 लाखाचं उत्पन्न झालं आहे.