पुण्यातील ज्योतिषानं सांगितला राम मंदिराचा मुहूर्त

पुण्यातील ज्योतिषानं सांगितला राम मंदिराचा मुहूर्त

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. 

प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा सोमवारी 22 जानेवारीला मृगाशिरा नक्षत्रातील मुहूर्तावर होणार आहे.

पण अनेकांना माहिती नसेल की हा शुभमुहूर्त पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी काढला आहे. 

एप्रिल 2023 मध्ये राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी त्यांना आश्रमात बोलवलं होतं

राम मंदिर प्रतिष्ठापनेचा 25 जानेवारीच्या आतला आणि उत्तरायणा मधला मुहूर्त त्यांना हवा होता. 

पौष महिन्याबद्दल अनेक समज गैरसमज असल्याने प्राचीन ग्रंथात शोध सुरू केला. 

काही ग्रंथांचं परिशिलन केल्यानंतर पौष महिना हा अतिशय उत्तम असल्याचं समजलं. 

प्राण प्रतिष्ठापनेसाठी द्वादशी, सोमवार, मृग नक्षत्र या सर्वांचा मिळून 22 जानेवारीचा दिवस निवडला.

मेष लग्नाचा सव्वा दोन तासाचा वेळ काढून देण्यात देण्यात आला आहे, असे देशपांडे सांगतात. 

मकर संक्रांती कधी आहे, 14 की 15 जानेवारी?