चक्क काच कापून बनवली जातेय प्रतिमा

चक्क काच कापून बनवली जातेय प्रतिमा

काचेच्या माध्यमातून एखादी प्रतिमा साकारणे ही अत्यंत दुर्मिळ असणारी कला आहे. 

स्टेन ग्लासच्या माध्यमातून सुंदर प्रतिमा साकरण्याचे काम पुण्यातील राहुल लोहकरे करत आहेत. 

सिहंगड रस्ता परिसरातील घरातच ते गेल्या 21 वर्षांपासून हे अवघड मानजं जाणारं काम करत आहेत.

स्टेन ग्लास वर्क म्हणजे काच कट करून त्यापासून लोहकरे यांनी आतापर्यंत 142 प्रतिमा तयार केल्या आहेत.

पहिल्यांदा स्टेन ग्लासपासून बालाजीची प्रतिमा तयार केली. पण तेव्हा थोडं टेन्शन होतं, असं ते सांगतात.

जी काच प्रतिमा तयार करायची आहे त्याची सर्व प्रथम डिजिटल प्रिंट घेतली जाते आणि त्याचं ट्रेसिंग केलं जातं. 

काचेच्या रंगसंगतीचा विचार करून प्रतिमा तयार होते. त्यानंतर ती प्लायवूड बॉक्समध्ये बसवली जाते. 

साधारणपणे काच प्रतिमेची किंमत 25 हजार रुपये पासून सुरू होते, असं लोहकरे यांनी सांगितलं. 

विहीर नव्हे हा तर 'छत्रपतीं'चा राजवाडा