पुण्यात 10 रुपयांत मिळतात मातीची भांडी

पुण्यात 10 रुपयांत मिळतात मातीची भांडी

आपणही घर सजवण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी मातीची भांडी उत्तम पर्याय आहे. 

विशेष म्हणजे पुण्यात विविध मातीची भांडी केवळ 10 रुपयांपासून मिळत आहेत. 

शिवाजीनगरच्या बाजूने येताना डेंगळे पूल संपला की कुंभारवेस सुरू होते. 

या ठिकाणी 10 रुपयांपासून मातीच्या वस्तू आणि भांड्यांचे अनेक प्रकार मिळतात. 

मातीची भांडी 10 रुपयाला चहाचा कप आणि 200 रुपयाला मोठी कढई मिळते. 

मातीच्या भांड्यामध्ये माठ, पाण्याची बाटली, कढई, तवा, दिवे, ग्लास, कप, असे खूप प्रकार पाहायला मिळतात.

किचनमध्ये जास्त टिकाऊ आणि स्वस्त भांडी हवी असतील तर मातीची भांडी ट्राय करू शकता. 

मातीच्या भांड्यांच्या खरेदीत गेल्या तीन वर्षांत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

पुण्यात इथं आहे दुर्मिळ वस्तूंचा खजिना