आपल्या गावात देवराई आहे का?

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले आणि पवित्र समजले जाणारे जंगल होय. 

देवराई हा वृक्ष संवर्धनाचा एक चांगला मार्ग असून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर राबवला जातोय.

मानव निर्मित देवराई साकारणारे रघुनाथ ढोले यांनी देवाराई प्रकल्पाबाबत माहिती दिलीय. 

मानवनिर्मित 'देवराई' आणि 'घनवन' उभारण्यासाठी विनामूल्य सहकार्य हे देवराई फाउंडेशन करत आहे. 

एक एकर जागेत 119 प्रकारच्या 515 वनस्पती आणि त्या लागवडीचा आराखडाही विनामूल्य दिला जातो. 

मानव निर्मित देवराईची 20 वर्षा पूर्वी यवतमाळ या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 

जसं पुस्तकांची लायब्ररी असते तशी एक एकर क्षेत्रामध्ये झाडांची लायब्ररी लावता येते. 

देवराईमुळे मधमाशा, फुलपाखरांचं संवर्धन होतं आणि शेतीच्या उत्पन्नात 30 टक्क्यांची वाढ होते.