मूकबधिरांना जगण्याचा विश्वास देणारा अवलिया! 

त्यांना ऐकायला येत नाही म्हणून बोलताही येत नाही. लौकिकार्थाने मूकबधिर म्हणूनच त्यांची गणना होते.

स्वत:च्या या व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेल्या अशा व्यक्ती कुचेष्टेच्या भीतीने सामान्य जनांपासून चार हात दूर राहाणे पसंत करतात.

मात्र या व्यक्तींना आता स्वतःची स्वप्नं पाहता येणार आहेत. त्यांच्या स्वप्नांना उंच भरारीसाठी पंख फुटत आहेत.

कारण त्यांच्या पंखांना बळ देणारं दुकान त्यांना मिळालं आहे. हे दुकान म्हणजे पुणे येथील सदाशिव पेठेत विश्वास पाचकंठी यांनी सुरू केलं आहे.

कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या बाजारपेठेतील एक लेन म्हणजे बाजीराव रोडवर असलेल्या भगवती सिल्क हे सध्या महिलांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.

भगवती सिल्क या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या आणि रंगाच्या आकर्षक अशा साड्या उपलब्ध आहेत.

मात्र या साड्या ग्राहकांना दाखवणाऱ्या व्यक्ती मूकबधिर असल्यामुळे या दुकानात साडी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते.

या दुकानामध्ये 25 लोक कामाला आहेत.

7 पुणेकरांची सायकलवारी, 8 दिवसांत कन्याकुमारी