रक्षाबंधनासाठी हटके गिफ्ट्स; ‘इथं’ करा खरेदी

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीचा सण. या खास सणाच्या दिवशी बहिणीला राखी बांधल्यानंतर भाऊ तिला भेट देतो.

पुण्यातल्या बाजारपेठेत या हटके वस्तू आल्या आहेत.

सदाशिव पेठेतल्या नागनाथ पार चौकात पैठणीच्या वस्तूंचे स्वप्नगंधा हे दुकान आहे.

या दुकानात रक्षाबंधनासाठी अस्सल पैठणीच्या साडीपासून बनवलेल्या वस्तू आहे.

या ठिकाणी पैठणीच्या कपडा पासून बनवलेल्या पन्नास रुपयांच्या स्क्रंचीज आहेत.

रुपयांना स्लिंग बॅग आहे, सुंदर अशा वेगवेगळ्या पैठणीपासून बनवलेले बटवे आहेत.

याचे वेगवेगळे कॉम्बिनेशनही तुम्ही देऊ शकता.  तुमच्या छोट्या बहिणीला देण्यासाठी सुंदर असे पैठणीचे हेअर बँड आहेत.

तसेच पैठणीच्या इयरिंग्स, छोट्या क्लिप अशा पैठणीपासून बनवलेल्या वस्तू इथं मिळतील, अशी माहिती ऋतुजा गोखले यांनी दिली.

 युनिक पद्धतीच्या पैठणीच्या साड्यांचे कव्हर असलेल्या नोटबुक्सही इथं तुम्ही गिफ्ट म्हणून देण्यासाठी खरेदी करु शकता.