आता आई-वडिल म्हणतील 'मावळा' खेळा

आता आई-वडिल म्हणतील 'मावळा' खेळा

गेमच्या विळख्यात अडकून तासनतास ऑनलाईन गेम खेळणारे तरुण पाहिले असतील. 

आता एक स्वदेशी गेम आली असून ही खेळा म्हणून आई-वडिलच आग्रह करणार आहेत. 

छत्रपती शिवरायांचा इतिहासाचा पट उलगडत शिवकालीन मोहरा मिळवण्याची संधी मिळणार आहे. 

पुण्यातील अनिरुद्ध राजदेरकर आणि शंतनू कुलकर्णी यांनी मावळा गेम बनवली आहे. 

शिवरायांच्या जीवनावरील खेळांतून इतिहास आणि मनोरंजन दोन्ही गोष्टींचा आनंद मिळणार आहे. 

 'अफजल खान एन्काउंटर' या गेममधून शिवकाळातील अफजलखान वधाचा थरार अनुभवता येणार आहे. 

अफजलखान एन्काउंटर या गेमला राष्ट्रीय स्तरावर नावाजलं गेलं असून भारत सरकारने कौतुक केलंय. 

शिवाजी महाराजांवरील या खेळांमुळे लहान मुलांना इतिहासाबद्दल माहिती मिळणार आहे. 

https://news18marathi.com/web-stories/local18/upsc-success-story-jalna-farmer-son-ajinkya-shinde-topped-upsc-exam-in-maharashtra-mnkj-l18w-1533699/