आतापर्यंत आपण विविध भारतीय कला सादर करणारे कलाकार पाहिले असतील.
पण, अमेरिकन स्टॅच्यू मॅनच्या कलेत माहीर असणारा मराठमोळा तरुण माहितीये का?
पुण्यातील कलाकार कट्टा इथे स्टॅचू मॅनची कला सादर करणाऱ्या सद्धार्थ पिटेकरची महाराष्ट्राचा स्टॅच्यू मॅन अशीच ओळख निर्माण झालीय.
सिद्धार्थ हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील असून त्याने युट्युबवर बघून ही कला आत्मसात केल्याचे सांगितले.
स्टॅच्यू मॅन ही मुळची अमेरिकन कला आहे. पुतळ्या सारखं एका जागेवर स्थिर उभ राहणं याला स्टॅचू मॅन कला म्हणतात.
सिद्धार्थला लहानपणापासूनच कलेच्या क्षेत्रात जायचं होतं.
त्यातच त्याला स्टॅच्यू मॅन कलेबाबत माहिती मिळाली आणि तो या क्षेत्राकडे वळला, असं सिद्धार्थ सांगतो.