नाचणीच्या पिठापासून बनवा स्वादिष्ट चॉकलेट पॅनकेक 

नाचणीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. तेव्हा यापासून मुलांचे आवडते चॉकलेट पॅनकेक बनवण्याची रेसिपी ट्राय करा.

सामग्री

नाचणी - एक कप कोको पावडर - दोन चमचे साखर - दोन चमचे बेकिंग पावडर - एक चमचा मीठ चवीनुसार अंड - एक दूध - एक कप बटर- दोन चमचे वॅनिला एक्सट्रॅक्ट - एक चमचा चॉकलेट चिप्स - दोन कप मध - दोन चमचे

एका भांड्यात नाचणीचे पीठ, कोको पावडर, साखर, बेकिंग पावडर, मीठ इत्यादी सामग्री टाकून मिक्स करा.

दुसऱ्या भांड्यात दूध, वितळलेले बटर, व्हॅनिला इसेन्स आणि एक अंड फोडून टाका. मग हे बटर सॉफ्ट होई पर्यंत फेटून घ्या.

दोन्ही भांड्यातील साहित्य एकत्र करा आणि छान मिक्स करून घ्या. जर बॅटरमध्ये काही गुठळ्या असतील तर त्या नीट करा आणि चांगलं फेटून घ्या. मग यात चॉकलेट चिप्स टाका.

मिक्स केललं बॅटर 10 ते 15 मिनिटं तसेच राहू द्या.

आता एक नॉनस्टिक तवा घेऊन तो मध्यम आचेवर गरम करा. पॅनवर थोडे बटर लावा आणि पॅनकेक बनवण्यासाठी बॅटर तव्यावर टाका.

पृष्ठभागावर बुडबुडे तयार होईपर्यंत आणि कडा सेट होई पॅनकेक्स तव्यावर 3-4 मिनिटे शिजवा.

मग पॅनकेक्स काळजीपूर्वक पलटवा आणि आणखी 3-4 मिनिटे हलके तपकिरी होईपर्यंत शिजवा.

पॅनकेक्स शिजल्यावर ते प्लेटमध्ये काढून घ्या आणि मग त्यावर मध किंवा चॉकलेट सिरप टाकून खावा.