शिवप्रेमी सायकलवरून एव्हरेस्ट मोहिमेवर

शिवप्रेमी सायकलवरून एव्हरेस्ट मोहिमेवर

छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे नाते अतुट आहे. 

शिवरायांनी ज्या किल्ल्यांच्या साक्षीने इतिहास घडवला ते आजही अनेकांसाठी स्फूर्तिस्थान आहेत. 

याच प्रेरणेतून एका ध्येयवेड्या तरुणाने राज्यातील 350 हून अधिक किल्ले सर केले.

आता स्वराज्याची भगवी पताका जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर फडकवण्यासाठी तो निघालाय.

विशेष म्हणजे ही मोठी मोहीम सुबोध गांगुर्डे हा 24 वर्षीय तरुण सायकलवरून पूर्ण करणार आहे. 

सुबोध हा मुळचा रायगड जिल्ह्यातील रोहा येथील रहावसी असून तो एक शिवप्रेमी आहे. 

आत्तापर्यंत सुबोधने 342  किल्ले सर करत 15,675 किलोमीटरचा प्रवास सायकलने केला आहे. 

शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा संदेश तो देतो. 

हा संदेश देण्यासाठीच सुबोधने 26 नोव्हेंबर 2023 रोजी घर सोडले आणि सायकल प्रवास सुरू केला.

सुबोधच्या या दृढ निश्चयाचे आणि मेहनतीचे महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमींकडून कौतुक होत आहे.