इथे फक्त वर्षातून १५ दिवस थांबतात ट्रेन, देशातील एकमेव स्टेशन
अनुग्रह नारायण रोड घाट रेल्वे स्टेशन बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधण्यात आले आहे.
हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते.
गेल्या 26 वर्षांपासून येथे एकही तिकीट विकले गेले नाही आणि काउंटरही बंद झाले आहेत.
दरवर्षी पितृपक्षात ही गाडी येथे १५ दिवस थांबते.
लोक श्राद्धाच्या वेळी तर्पण अर्पण करण्यासाठी जवळ असलेल्या पुनपुन नदीवर जातात.
दरवर्षी पितृपक्षातच लोक इथून ये-जा करतात.
4-5 रेल्वे कर्मचारीही वर्षातून 15 दिवस येथे तैनात असतात.
15 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात तिकीट वाटपाची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे.
हे स्थानक पूर्व-मध्य रेल्वेच्या दीनदयाल उपाध्याय विभागात आहे.