ED च्या रडारवर आलेत हे सेलिब्रिटीज!

ED च्या रडारवर आलेत हे सेलिब्रिटीज!

नुकतंच रणबीर कपूरला ED ने समन्स बजावलं असल्याने तो चर्चेत आला आहे.

शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांना 'फेमा' चे उल्लंघन केल्याप्रकरणी ED ने 73.6 कोटी रुपयांचं समन्स बजावलं होतं. 

या प्रकरणात शाहरुख खान सोबतच अभिनेत्री जुही चावलाचा देखील समावेश होता. 

पनामा पेपर्स प्रकरणात बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांची देखील ED चौकशी झाली होती. 

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची ड्रग्ज प्रकरणात चौकशी झाली होती. 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुशांत सिंग राजपूत प्रकरणात  ED कडून चौकशी झाली होती. 

अभिनेत्री तापसी पन्नूवर देखील ED ने कारवाई केली होती. 

अभिनेत्री यामी गौतमला देखील परकीय चलन घोटाळ्याप्रकरणी  ED ने समन्स बजावलं होतं. 

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला सुद्धा पंजाबच्या नेत्यांसोबत अवैध व्यवहार केल्या प्रकरणी ED ने समन्स बजावलं होतं.