जेवणात वापरल्या जाणाऱ्या मीठापासून तर लोकांना आकाशात सफारी घडवण्यापर्यंत सगळीकडे तुम्हाला Tata Group चं नाव दिसेल.
देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी टाटा ग्रुपला यशाच्या शिखरावर पोहोचवणारे टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटांचे पर्सनल आयुष्यही इंट्रेस्टिंग आहे.
85 वर्षांच्या रतन टाटांनी लग्न केलं नाही. पण असं नाही की, त्यांना कधी प्रेम झालं नाही. प्रेम झालं पण लग्नापर्यंत ते पोहोचू शकलं नाही.
Ratan Tataनी स्वतः अनेकदा आपल्या आयष्यातील घटनाक्रमाचा उल्लेख करत आपल्या प्रेम कहाणीविषयी सांगितलं आहे.
टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटांना अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये शिक्षण पूर्ण करत असताना प्रेम झालं होतं.
त्या काळाविषयी बोलताना रतन टाटा सांगतात की, तो खूप चांगला काळ होता आणि वातावरणही चांगलं होतं.
Los Angeles मध्ये त्यांना एका मुलीवर प्रेम झालं होतं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
याच दरम्यान भारतातून एक वृत्त आले, की त्यांच्या आजीची तब्येत खराब झाली आणि ते परत आले.
याच दरम्यान भारतातून एक वृत्त आले, की त्यांच्या आजीची तब्येत खराब झाली आणि ते परत आले.
रनत टाटांनुसार, मी माझ्या आजीपासून 7 वर्षांपासून दूर होतो आणि हे वृत्त ऐकताच मी अस्थायीरित्या भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
मी विचार केला होता की, जिच्यासोबत मला लग्न करायचंय ती माझ्यासोबत भारतात येईल. पण 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे तिचे पालक लग्नासाठी तयार झाले नाहीत आणि लग्न मोडलं.