रवींद्र जडेजाच्या वडिलांचे
सुनेवर गंभीर आरोप
'तिनं माझ्या मुलावर काय जादू केलीय माहीत नाही', असं जडेजाचे वडिल म्हणतात.
क्रिकेट स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या वडिलांनी आपल्या सुनेवर
गंभीर आरोप केले आहेत.
सून रिवाबा जडेजाच्या विविध गोष्टींवर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
मुलाखतीत त्याचे वडील म्हणाले - सुनेनं माझ्या मुलावर काय जादू केली कळत नाहीय.
जडेजा आणि त्याचे वडील वेगळे राहतात.
जडेजाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, लग्नाच्या 3-4 महिन्यांनंतरच वाद सुरू झाला.
मी माझ्या मुलाला क्रिकेटर बनवायला नको होतं, असं वाटतंय.
अनिरुद्ध जडेजा यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या सूनेला फक्त पैशांशी मतलब आहे.
दिव्य भास्करला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत.
मुलगा आणि सून यांच्यापासून ते वेगळे जामनगरमध्ये 2 BHK फ्लॅटमध्ये राहतात.
रवींद्रच्या सासूचा आमच्या कुटुंबात फार हस्तक्षेप होतोय, जवळपास तीच सगळं सांभाळतेय.
मोठ्या बहिणीनं त्याला आईसारखं वाढवलं पण आता त्याला त्याचंही काही देणंघेणं नाही, असे ते म्हणाले.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.