Xiaomi चा 6GB रॅमचा फोन आता स्वस्त, कार्डवर एक्स्ट्रा बचत

Xiaomi ने Redmi 12 यावर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केला होता.

कंपनीने आता या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे.

हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो आणि याचे 6GB व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आलीये.

Xiaomi ने फोनचा 6GB रॅम व्हेरिएंट 11,999 रुपयांत लॉन्च केला होता.

आता या व्हेरिएंटची किंमत 1,500 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलीये.

अशा वेळी आता ग्राहक हा व्हेरिएंट 10,499 रुपयांत खरेदी करु शकता.

HDFC बँक कार्डच्या माध्यमातून 1000 रुपयांचं इंस्टंट डिस्काउंटही मिळेल.

हा फोन MediaTek Helio G88 प्रोसेसरसह येतो.

याच्या रियरमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सिस्टमही मिळते.