घरात झालाय का झुरळांचा सुळसुळाट? मगं असं लावा पळवून

पावसाळ्यात अनेकदा घरात झुरळं दिसतात किंवा शिरतात.

स्वयंपाकघरात झुरळ आढळल्यास स्वच्छतेवर तसेच आरोग्यावर परिणाम होतो.

झुरळांना काही सोप्या मार्गांनी स्वयंपाकघरातून हकलवून देऊ शकता. चला याबद्दल जाणून घेऊ

तमालपत्राला चुरडून त्याला स्वयंपाकघरात ठेवल्याने झुरळ पळून जातील.

पिठात बोरिक पावडर मिसळून गोळ्या बनवून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवाव्यात.

बेकिंग सोडा, साखर यांचा सप्रे करुन तो  शिंपडू शकता, यामुळे झुरळे येत नाहीत.

किचनच्या ड्रॉवरमध्ये 4-5 लवंगा ठेवल्याने झुरळ जवळ येणार नाहीत.

रॉकेलच्या वासानेही झुरळे पळून जातात.

किचनच्या कोपऱ्यात अंड्याची टरफले ठेवल्याने झुरळे येणार नाहीत