आपल्या आजूबाजूला अनेक प्रेरक घटना घडत असतात.
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अनेक तरुण तरुणी यशाची नवनवी शिखरे पार करत असतात.
अशीच प्रेरक कहाणी आहे जालना शहरात शंकरनगर इथे राहणाऱ्या गायत्री ठोंबरे हीची आहे.
वडील रिक्षा चालवितात, आई एका खासगी संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते.
घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही गायत्रीने पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौसेनेत भरती झाली आहे.
View All Products
गायत्री ज्ञानेश्वर ठोंबरे हीच दहावीपर्यंतचे शिक्षण नूतन विद्यालय जुना जालना येथे झालं.
तर बारावीपर्यंतचे शिक्षण देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झालं.
त्यानंतर तिची भारतीय नौसेनेत निवड झाली आहे.