उजव्या की डाव्या? रात्री कोणत्या कुशीवर झोपणं फायदेशीर?

अनेकांना स्ट्रेस, आरोग्याच्या समस्या इत्यादींमुळे शांत झोप लागत नाही. अपुऱ्या झोपेमुळे तब्यते खराब होऊन अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं.

अशावेळी झोपताना नेमक्या कोणत्या कुशीवर झोपावं याविषयी जाणून घेऊयात.

उजव्या कुशीपेक्षा डाव्या कुशीवर झोपणे कधीही चांगले. डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयावर दबाव जाणवत नाही आणि हृदय योग्य पद्धतीने काम करतं.

डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो.

गरोदर स्त्रियांसाठी देखील डाव्या कुशीवर झोपणे कधीही चांगले. यामुळे टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.

डाव्या कुशीवर झोपल्याने रक्तप्रवाह सुरळीत होत असल्याने झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही तसेच पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

डाव्या कुशीवर झोपल्याने पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही.

बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे, यामुळे आराम मिळतो.

गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.

सदर मजकूर ही इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा जीवशैलीत कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बातमी वाचण्यासाठी हेडींगवर क्लिक करा