हिवाळ्यात वाढला ब्रेन स्ट्रोकचा धोका, असा करा बचाव

हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकची तक्रार वाढते.

रांची येथील रिम्समधील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. विकास यांनी याबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, कुणालाही ब्रेन स्ट्रोकची समस्या होऊ शकते.

मॉर्निंग वॉक हा अगदीच सकाळी करू नये. हलकं ऊन आल्यावरच जावे.

सोबतच वेळेवर औषधी घेत राहा. अंघोळ करताना हलक्या गरम पाण्याने अंघोळ करा.

हिवाळ्यात प्रत्येक व्यक्तीला थोडा वेळ कोवळ्या ऊन्हात उभे राहायला हवे.

यामुळे तुम्हाला पुरेसे व्हिटामिन डी मिळेल.

शारिरीक अ‍ॅक्टिव्हिटीही वाढवा. यामुळे ब्लड सर्कुलेशन योग्य राहील.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि मोसमी फळेही खा.